लाकूड वाहतूक परवाण्यासाठी वनपालाने घेतली १ लाख रूपयाची लाच

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केले रंगेहाथ अटक

चंद्रपूर: लाकूड वाहतूकीचा परवाना ( T.P.) देण्यासाठी कंत्राटदाराकडून १ लाख रूपयांची लाच स्विकारतांना पाथरी उपवनक्षेत्रातील वनपाल वासुदेव लहानु कोडापे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे.

Recommended read: गळफास घेतलेल्या अवस्थेत तरूणांचा मृतदेह आढळल्याने खळबळ

तक्रारदार सिंदेवाही येथील कंत्राटदार असून गावातील शेतकरी यांच्या शेतातील कटींग केलेले सागवान लाकुड वाहतुक करण्याकरीता लागणारा ठेकेदाराकरीता निर्गत परवाना ( T.P.) देण्याच्या कामाकरीता उपक्षेत्र पाथरी येथील वनपाल वासुदेव लहानुजी कोडापे,यांनी तक्रारदाराकडे १ लाख २ हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदारास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून १ लाख २ हजार रूपयांची मागणी करून तडजोड अंती १ रूपये स्वतः स्विकारतांना शासकिय निवास स्थानी पकडण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास कार्य सुरु आहे.

सदरची कार्यवाही उपअधिक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात शिल्पा भरडे यांच्या पथकाने केली आहे.

One thought on “लाकूड वाहतूक परवाण्यासाठी वनपालाने घेतली १ लाख रूपयाची लाच”
  1. […] पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू लाकूड वाहतूक परवाण्यासाठी वनपालाने… गळफास घेतलेल्या अवस्थेत तरूणांचा […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!