वनविभागाची मुजोरी :कंटाळून वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

गोंडपिपरी : तालुक्यातील गोजोली येथील साठ वर्षीय शेतक-याने वनविभागाचा मुजोरी ला कंटाळून आपल्या घरीच विष प्राशन करून जिवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. शेतकरी गंभीर असून त्याला उपचारासाठी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Recommended read: सुंगधित तंबाखू पुरवठादारांवर मोक्का लावणार – मंत्री संजय राठोड

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वन हक्क दावा प्रलंबित असताना वनविभागडून उभे पिक असलेल्या शेतीतील अतिक्रमण काढण्यासाठी शेतक-यावर दबाव टाकण्यात आला असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. यामुळे आता वनविभागाचे कर्मचारी गोत्यात सापडले आहेत. वन मंत्राच्या जिल्ह्यात हा प्रकार झाल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोजोली येथील गणपती सोनूने हे वनविभागाच्या जाग्यावर 1984 पासून शेती करित आहेत. सोनूने यांच्यासोबत अनेकांनी वनजमीनीचे पटटे मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला असून सदर अर्ज प्रलंबित आहे. सोनूने कुटुंबियांच्या सांगण्यावरून काल काही वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी व वनकर्मचारी वारंवार अतिक्रमण काढण्यासंदर्भात शेतक-यांवर दबाव टाकत होते.

Recommended read: चंद्रपूरात पहिल्यांदाच श्री माता महाकाली महोत्सव

वनकर्मचा-यानी उभे पिक असलेल्या शेतात येउन अतिक्रमण काढण्यासाठी बजावले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी उभ्या पिकाचे नास धूस केल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याचाच धसका घेत आज रविवारी सकाळच्या सुमारास गणपती सोनुने यांनी किटकनाशक प्राशन करून जिवन संपविण्याचा प्रयत्न केला.

विष प्राशन केल्याची माहिती कुटुंबीयांना होतात त्यांनी गणपतीला रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Recommended read: एका जहाल नक्षलवाद्यांस कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

वनविभागाकडून आम्ही कुणालाही काही बोललो नाही, कुणाच्या शेतात जाउन अतिक्रमण काढा असे सांगितले नाही. आमच्यावर लावण्यात आलेले आरोप हे चुकीचे आहेत.- राजेंद्र लडके, वनक्षेत्र सहायक गोंडपिपरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!