पुल बांधकाम : दाेन लाख रूपयांची लाच घेतांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्त्यास अटक

चंद्रपूर: कंत्राटदाराने बांधकाम केलेल्या पुल बांधकामाचे १ कोटी रूपयांचे बिल काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिवती येथील कनिष्ठ अभियंत्ता अनिल जगन्नाथ शिंदे याला २ लाख रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.

Recommended read: अकबर ,औरंगजेबाची चांदीची नाणी चंद्रपुरात सापडली

यवतमाळ येथील मुंगसाजी कंन्स्ट्रक्शन कंपनी ने जिल्ह्यातील जिवती तालुक्यात आरसीएलडब्यूई या केंद्र शासनाच्या योजनेतंर्गत पुल बांधण्याचे काम घेतले होते. कंत्राटदाराने पुल बांधकाम केल्यानंतर अंदाजे १ कोटी रूपयांचे चार बिले जिवती कार्यालयात सादर केले. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे जिवती येथील कनिष्ठ अभियंत्ता अनिल जगन्नाथ शिंदे यांनी दोन बिले आता व उर्वरित दोन बिले नंतर मंजूर करवून देण्याच्या कामाकरीता दोन लाख रूपयांची लाच मागितली. कंत्राटदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

Recommended read: गावातील युवकाने लावला गावकऱ्यांना करोडो रुपयाचा चुना

तक्रारीच्या आधारे सापळा रचून कनिष्ठ अभियंत्ता अनिल जगन्नाथ शिंदे याला २ लाख रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली आहे. सदरची कारवाई चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!