गावाभोवती पूर, पोटच्या पोराला मेंदूज्वर आणि रूग्णांलयात नेण्याचा थरार

गावाभोवती पूर आणि तहसीलदार तत्परता

तोहोगाव: गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगावला वर्धा नदीला पूर आल्याने पाण्याने वेढले गेले आहे. अशातच गावातील साहिल कालिदास वाघाडे या मुलाला मेंदूज्वर हा जीवघेणा आजार झाला. तात्काळ जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे आई वडीला समोर रुग्णालयात न्यायचे कसे असा प्रश्न पडला.

Recommended read: ताडोबा लगतच्या अलिझंजा जंगलात वाघाच्या हल्यात गुराखी ठार

गावातील प्रमुख लोकांसमोर आपबीती सांगितली माजी उपसरपंच फिरोज पठाण यांनी तहसीलदारांना फोन करून गंभिरता सांगितली तहसीलदारानेही वेळ न घालविता घनदाट जंगलातील कन्हाळगाव कॅम्प नंबर 4 मार्गे रुग्णवाहिका घेऊन स्वत: आले.

तहसीलदार तत्परता

इकडे गावकऱ्यांनी रुग्ण व पालकांना नावेने पुराचे पाण्यातून नेण्याची व्यवस्था केली. तहसीलदार त्या रुग्णास नेण्याची वाट पहात होते परंतु सुमारे चार किलोमीटर अंतर समोर भले मोठे झाड उन्मळून पडल्याने वाहन समोर जाऊ शकत नव्हते. इकडे जीव वाचविण्याची धळपळ आणि तिकडे अडथळे आवासून उभे होते.

Recommended read: कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम धरण ओव्हरफ्लो

अखेर निराश होऊन त्या रुग्णांस परत गावातच आणून प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करून उपचार सुरू आहे.

पुराचे पाणी गावाला वेढले असल्याने त्या रुग्णांच्या जीवनाशी खेळ सुरू आहे. प्रशासन व नागरिक हतबल होताना दिसत होते. त्यामुळे गावाला या संकटातून वाचविण्यासाठी उंच पूल बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. परंतु आजची रात्र त्या रुग्ण व पालकासाठी महत्वाची आहे. अशा परिस्थितीत एखादी गंभीर रुग्ण उपचारा अभावी दगावल्यास जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

2 thoughts on “गावाभोवती पूर, पोटच्या पोराला मेंदूज्वर आणि नावेतून रूग्णांलयात नेण्याचा तो थरार”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!