आसोलामेंढा : चौघांना वाचविण्यात यश, मुलगी बेपत्ता

चंद्रपूर : सावली गावालगत आसोलामेंढा नहरात अंघोळीसाठी गेलेली पाच मुले पाण्यात बुडाली. यातील चौघांना वाचविण्यात यश आले तर काजल अंकुश मक्केवार नहरात वाहून गेल्याने तिचा शोध सुरू आहे.

Recommended read: तुडूंब भरलेल्या चारगाव धरणात दोघेजण बुडाले

सावली गावाला लागून असलेल्या असोलामेंढा नहर येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईसोबत रोहित अनिल मेडपल्लीवार (वर्ग ७ ) आणि अमित अनिल मेडपल्लीवार ( वर्ग ५) यांच्यासह राहुल अंकुश मक्केवार (वर्ग ४), सुश्मिता अंकुश मक्केवार (वर्ग ८) व कु. काजल अंकुश मक्केवार (वर्ग ५) ही पाच मुले गेली होती. यावेळी पाचही जण नहरात अंघोळीसाठी उतरले.

दरम्यान, पाचही मुले पाण्यात बुडू लागली. हे पाहून तेथे उपस्थित असलेल्यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून तेथून जवळच असलेल्या शासकीय धान्य भांडारमधील कामगार बालू भंडारे यांनी तेथे धाव घेत नहरात उडी घेतली. भंडारे यांना चौघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, काजल वाहून गेली.

Recommended read: मुलीने केली प्रियकरांच्या मदतीने आईची हत्या

घटनेची माहिती सावलीचे ठाणेदार आशीष बोरकर यांना देण्यात आली. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत आपल्या चमूसह मुलीचा शोध सुरू केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!