आयोजकांची पत्रकार परिषदेत माहिती

चंद्रपूर: पंधराव्या शतकावर आपल्या कार्य आणि कर्तुत्वाचा अमीट ठसा उमटविणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे गुरु तथा एकात्मतेचे प्रतीक असलेले संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त संत कबीर महोत्सव समिती, चंद्रपूरव्दारे मंगळवार १४ जून २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात संत कबीर महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी पत्रपरिषदेत दिली.

या प्रबोधानाच्या प्रथम सत्रात आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक तथा संत कबीर महोत्सव समिती, चंद्रपूरचे अध्यक्ष खुशाल तेलंग हे या महोत्सवाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. छत्तीसगडचे ‘चलो बुद्ध की ओर’ या अभियानाचे प्रसारक नंदकुमार बघेल यांच्या शुभहस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. देशक खोबरागडे स्वागताध्यक्ष राहणार आहे. यावेळी मान. डॉ. राम पुनियानी (प्रोफेसर, आय. आय. टी. तथा इतिहास तज्ज्ञ, दिल्ली) आणि मान. जे. डी. सारय्या (पेरियार ग्रुप, हैदराबाद) हे याप्रसंगी प्रबोधनात्मक मार्गदर्शन करणार आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध नाटककार मान. संजय जीवने (नागपूर) लिखित तथा दिग्दर्शित ‘कबीर’ हे संत कबीरांच्या जीवनावरील एकल नाट्य सादर होणार आहे. तसेच मान. पवन भगत आणि डॉ. भावना भगत हे याप्रसंगी संत कबीरांच्या निवडक दोह्यांचे सादरीकरण करणार आहेत. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचा प्रारंभ एफ. ई. एल. गर्ल्स कॉलेज, चंद्रपूर येथील संगीताचे प्राध्यापक अशोक बनसोड यांनी संगीतबद्ध केलेल्या संत कबीरांच्या दोह्याने होणार आहे. संत कबीर जयंती निमित्त चंद्रपुरात पहिल्यांदा हा महोत्सव भव्य होत आहे. या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने राहणयाचे आवाहन समिती कार्यकारिणीचे रमेशचंद्र राऊत (उपाध्यक्ष), हिराचंद बोरकुटे (सचिव), प्रा.डॉ. इसादास भडके (सहसचिव), कोमल खोब्रागडे (कोषाध्यक्ष), रामसिंग सोहल (सदस्य), अनवर अली (सदस्य) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!