चेकलिखितवाड्यात भिषण आग, तीन घरे जळून खाक

५ लाखांचे ठाकूर कुटुंबियांचे नुकसान

चंद्रपूर: गोंडपिपरी तालुक्यातील चेकलिखितवाड्यात येथे शॉर्ट शर्किट मुळे आग लागून तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत निवारा राख झाल्याने ठाकूर कुटूंबियांवर मोठे संकट कोसळले आहे.

चेकलिखितवाडा येथील बाबुराव ठाकूर,सुभाष बाबुराव ठाकूर, अमित बाबुराव ठाकूर तीन कुटुंबियांचे घर आजूबाजूला असून अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घर जळून खाक झाले. या आगीत अंदाजे १० क्विंटल धान, जीवनावश्यक वस्तू सह ८० हजार रुपये रोख रक्कम व घरातील इतर साहित्य जळून खाक झाले.

या आगीत अंदाजी ५ लाखाची नुकसान झाली. दरम्यान गावातील नागरिकांनी एकत्र येत आग नियंत्रणात आणली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाचे वाहन देखील पोहचले.

यावेळी तहसीलदार के डी मेश्राम, मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे, ठाणेदार जीवन राजगुरू कुटूंबियांची भेट घेवून सांत्वन केले. पुढील तपास ठाणेदार राजगुरू करीत आहे.

One thought on “चेकलिखितवाड्यात भिषण आग, तीन घरे जळून खाक”
  1. […] गेलेल्या युवकावर वाघाचा हल्ला चेकलिखितवाड्यात भिषण आग, तीन घरे जळू… बावीस अठरापगड जाती संघटनांचा […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!