५७ हजार ६२८ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान

चंद्रपूर : अतिवृष्टी व पुरामुळे ५७ हजार ६२८ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले असून ९५ हजार ५४३ शेतकरी बाधित झाले आहे तर १ हजार ७२ गावांना अतिवृष्टी व पुराचा फटका असला आहे. पुरामुळे शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडल्याने वर्धा नदीला पूर आला आहे.

Recommended read: चंद्रपूर जिल्ह्यातील 2 हजार 600 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

भद्रावती व वरोरा तालुक्यातील अनेक गावे पुराखाली आल्याने आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने या भागातील २६०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. माजरी पोलीस ठाण्यालाही पुराने वेढा घातला आहे. वरोरा तालुक्यातील कुचना, पळसगाव, पाटाळा, कोंढा फाटा, बेलसनी, मानगाव, तळेगाव व आजूबाजूच्या अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक घरे पाण्याखाली गेल्याने घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, सावली, वरोर, भद्रावती, चिमूर, राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, पोंभुणा या तालुक्यातील ५७ हजार ६२८ हेक्टरवरील धान, कापूस, तूर, सोयाबीन, भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!