वीज कोसळून शेतकऱ्यांचा मृत्यू

चंद्रपूर: मुल तालुक्यातील दहेगाव येथे वीज कोसळून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. विलास रामुजी आलाम (४२) असे मृतक शेतकऱ्यांचे नाव आहे.

Recommended read: रानडुक्कराच्या हल्ल्यात शेतकरी ठार

विलास रामुजी आलाम हे आपल्या शेतात काम करीत असताना अचानक विजेच्या कडकडाट पाऊस आला. यादरम्यान शेतात वीज कोसळल्याने विलास आलाम याचा मृत्यू झाला.

त्यापश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई वडील असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. या दुःखद घटनेने दहेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!