गावकऱ्यांचा MSEB विरोधात संता प तात्काळ नुकसान भरपाईची मागणी

धाबा: शेतात चराई करता बैला सोबत नेलेले वासरू हाकलत असताना जमिनीवर कोसळलेल्या इलेक्ट्रिक मोटार पंपाच्या विद्युत पुरवठा करिता MSEB द्वारे उभारलेल्या खांबातून प्रवाहित असलेल्या विद्युत प्रवाहाचा शाक लागून सकमूर येथील शेतकरी राजेश्वर तोहगावकर (59) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तीन वाजता दरम्यान उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे .

Recommended read: गावाभोवती चौफेर पूर ,पोटच्या पोराला मेंदूज्वर आणि नावेतून रूग्णांलयात नेण्याचा तो थरार

मागील दहा दिवसांपासून धाबा-सकमुर परिसरात संत त धार पाऊस बरसत आहे या पावसामुळे वर्धा नदी ला पूर आला असून सक मूर गावाशेजारचे नालेही भरून वाहत आहेत संपर्क मार्ग बंद आहेत. गावकऱ्यांचे घराबाहेर पडणे बंद आहे अशा परिस्थितीत मुख्य जनावरांची उपासमार होऊ नये म्हणून मोकळ्या शेतात सकाळी दहा वाजता दरम्यान राजेश्वर तो होगावकर दोन बैल आणि एक वासरू चरावयास घेऊन गेले.

चरत- चरत वासरू इलेक्ट्रिक मोटार पंपाला विद्युत प्रवाह पुरवण्याकरता उभारलेले जे खांब कोसळले होते त्याच्या तारांमधून विद्युत प्रवाह प्रवाहित होत असलेल्या ठिकाणाच्या बाजूला गेले आडव्या पडलेल्या खांबाच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह प्रवाहित नाही हे पक्के माहीत असल्यामुळे राजेश्वर तोहगावकर यांनी तारा च्या जवळ जाऊन वासराला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्युत प्रवाह चालू होता व जमीन ओली होती त्यामुळे करंट लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Recommended read: त्या रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी तहसीलदार व ठाणेदार बनले देवदूत

शेजारी बैल चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्याने दूरध्वनी द्वारे गावात संपर्क करून घडलेली घटना सांगितली आणि गावात एकच खळबळ उडाली.

गावकऱ्यांनी धाबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुशील धोकटे यांचे शी संपर्क केला व पोलिसांसह घटनास्थळ गाठले. व घटनेचा पंचनामा केला.

दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशोक रेचन कर व गावकऱ्यांनी हा एमएसईबी कार्यालयाच्या निष्काळीपणामुळे झालेला मृत्यू असून एम एस ई बी ने मृतकाच्या कुटुंबियांना तात्काळ मदत करावी तरच आम्ही डेड बॉडी शव विच्छेदना करता नेऊ देणार अशी भूमिका घेतल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. बातमी लिहीपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नव्हता.

One thought on “सकमुरचा शेतकरी ठरला MSEB च्या निष्काळजीपणाचा बळी”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!