वाघाच्या हल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू

दहा दिवसात दोघांचा बळी

गडचिरोली: धानपिकाला पाणी देण्यासाठी शेतावर गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची केल्याची शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील अरसोडा गावानजीक घडली. नलू बाबूराव जांगडे (३५) रा. अरसौडा असे मृत महिलेचे नाव आहे.

Recommended read: तीन जणांचा बळी घेणारा बिबट जेरबंद

दहा दिवसात वाघाने दोघांचा बळी घेतला आहे नलू जांगडे हिला पती व तीन मुली आहेत. पती आजारी राहत असल्याने नलू आज सकाळी उन्हाळी धानपिकाला पाणी देण्यासाठी शेतावर गेली होती. मात्र, बांधाआड दडून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. यात ती जागीच गतप्राण झाली. घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यावेळी वाघ त्याच परिसरात होता. आरडाओरड करून नागरिकांनी वाघाला पिटाळून लावले. घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविला आहे.

३ मे रोजी देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूरनजीकच्या जंगलात गेलेल्या युवकास वाघाने ठार केले होते. त्यानंतर शेजारच्या आरमोरी तालुक्यातील अरसौडा येथे आज वाघाने महिलेस ठार केले आहे. १० दिवसांत ही दुसरी घटना घडल्याने दोन्ही तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत.

One thought on “वाघाच्या हल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!