वाघाच्या हल्ल्यात शेतमजूराचा मृत्यू

चंद्रपूर: मुल तालुक्यातील बफर वनपरिक्षेत्रातील काटवन येथील कक्ष क्रमांक ७५६ ला लागून असलेल्या शेतात शेतमजूर काम करीत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात शेतमजूरास जागीच ठार केल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

Recommended read: ओबीसी आरक्षणाला विरोध करणे ही संकुचित विचारसरणी : ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

राम कारू मरापे (४३) असे मृतक शेतकऱ्यांचे नाव आहे. राम मरापे हा शेतमजूर कक्ष क्रमांक ७५६ या जंगलव्याप्त क्षेत्राला लागून असलेल्या शेतात काम करण्यासाठी गेला होता. काटवन परिसर हा जंगलव्याप्त असल्याने येथे वन्यप्राण्यांचा मोठा वावर असतो. राम मरापे हा शेतात काम करीत असतांना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर जागीच ठार झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह वाघाने फरफटत नाल्याजवळ नेला होता.

Recommended read: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी नायगमकर हे पथकासह घटनास्थळी दाखल होवून मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. १५ मे ला वाघाने सोमनाथ येथे एका इसमाचा बळी घेतला होता.

One thought on “वाघाच्या हल्ल्यात शेतमजूराचा मृत्यू”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!