चंद्रपूर: मूल तालुक्यातील भादुर्णी जवळ असलेल्या पडझरी येथील ४२ वर्षीय इसम वनविभागाच्या बफर क्षेत्रात स्वतःच्या मालकीच गुरे चारण्याकरिता गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

Recommended read: डॉ. अशोक जीवतोडे : ओबीसी व विदर्भवादी चळवळीतील दमदार कार्यकर्ता

प्रमोद झुंगाची मोहुर्ले (42) असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती वनविभागाला दिली असून घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी पोहचले असून पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

पडझरी जंगल परिसरात नेहमीप्रमाणे गुरे चरण्याकरिता गेला असता दबा धरून असलेल्या वाघाने त्या शेतकऱ्यांवर हल्ला करुन ठार केले आहे. पडझरी हे गाव बफरझोन क्षेत्रात येत असून या परिसरात वाघाचे हल्ले होत असतात. त्यामुळे वाघाचा बंदोबत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

One thought on “वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, मुल तालुक्यातील पडझरी येथील घटना”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!