lightning, storm, weather-399853.jpg

चंद्रपूर: पावसाचे आगमन झाल्याने शेतकामाची लगभग सुरू झाली आहे. अशातच शेतीची मशागत करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर विज पडून तो ठार झाल्याची घटना सातारा तुकुम येथे आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

मधुकर देवाजी परचाके वय ( ४३) असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून तो पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकुम येथील रहिवासी आहे.सकाळी आपल्या शेतातील काम करुन घराकडे परत निघाला असताना रस्त्यात त्यांच्या अंगावर विज पडली यात तो जागीच गतप्राण झाला.

मृत शेतकऱ्याच्या मागे पत्नी तिन मुली असुन घरचा कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!