दोन बैलांसह शेतकऱ्यांच्या दुदैवी मृत्यू

चंद्रपूर: सायंकाळी शेतीचे काम आटोपून बैलबंडीने शेतकरी घरी येत असतांना बैलांना पाणी पाजण्यासाठी म्हणून बैलंबडी तलावात नेली असता, बैल बंडीसह शेतकरी बुडाल्याची धक्कादायक घटना गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथे सामवारी उघडकीस आली आहे. या अपघातात शेतकऱ्यांसह दोन बैलांचा दुदैवी अंत झाला.

Recommended read: कोंबडी चोरायला गेला अन जीवानिशी गेला

भास्कर बापूजी साळवे ४४ असे मृतक शेतकऱ्यांचे नावअसून या घटनेमुळे धानापूर गावात शोककळा पसरली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडवर घरातील कर्ता पुरूष काळाने हिरावल्याने साळवे कुटूंबियांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

रविवार १६ ऑक्टोबरला भास्कर साळवे हा शेतीचे कामे आटोपून सायंकाळी ६ वाजताच्यास सुमारास घरी येत होता. दरम्यान बैलांना पाणी पाजण्यासाठी म्हणून बैलांना बैलबंडीपासून विलग न करता बैलबंडी थेट तलावात नेली असता, बैलांना पाण्यात अंदाज न आल्याने शेतकऱ्यांसह तिघेही पाण्यात बुडाले. दरम्यान भास्कर हा घरी न परतल्याने कुटूंबियांनी शोध घेतली असता, तलावात बैल व बंडी दिसून आली.

Recommended read: आनंद नागरी बँक : घर एकाचं, कर्ज दिलं दुसऱ्यांला

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी बचाव पथकासह शोधमोहिम राबवून सोमवारी सकाळी शेतकऱ्यांच्या मृतदेहास दोन बैलांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटूंब हादरून गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!