वाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू
मूल : शेत कामासाठी शेतावर गेलेल्या शेतकर्‍यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शुक्रवार, 29 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. सुभाष कडपे (मु. जानाळा ४०) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.


मृतक गुरुवारी आपल्या शेतात शेतीकामाकरिता गेला होता. मात्र,तो रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नाही. शुक्रवारी त्याचा शोध घेतला असता, जंगल परिसरात असलेल्या शेतशिवारात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना कक्ष क्रमांक 523 मध्ये घडली. या घटनेची माहिती विभाग व पोलीस विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वन विभाग व पोलीस विभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृतकाच्या मागे त्याची पत्नी व मुलगी असा परिवार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!