महावितरण कडून चार लाख रूपये मदतीचे आश्वासन

चंद्रपूर: राजुरा येथून बारा किलोमीटर अंतरावरील चीचबोडी या गावी शेतात पडलेल्या महावितरण चा विजेच्या ताराच्या धक्क्याने गावातील शेतकरी शेख शहाबुद्दीन शेख गफ्फार, वय 44 याचा दुर्देवी मृत्यू झाला.

आज दिनांक 24 जुलै ला सकाळी ही घटना घडली. तरुण आणि कर्त्या मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. विरूर स्टेशन पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

Recommended read: पत्नीला पळवून नेल्याच्या रागात पतीने युवकाचा वडीलांचा केली निघृण हत्या

आज सकाळी शेख शहाबुद्दीन धान रोवणी करायची असल्याने आपल्या शेतात काम करण्यासाठी गेला. त्यावेळी त्याच्या शेतातील वीज मंडळाच्या विद्युत पोल वरील एक जिवंत विद्युत प्रवाह असलेला वायर तुटून खाली शेतातील चिखलात पडला होता. याची काहीही कल्पना नसल्याने शहाबुद्दीन सरळ शेतातील चिखलात उतरला. त्यावेळी शेतात चिखलात असलेल्या विद्युत प्रवाहाच्या ताराचा संपर्क आल्याने तो शॉक लागून जागीच मरण पावला. यानंतर शेतात येणाऱ्या अन्य व्यक्तीला याची माहिती होताच गावात माहिती देण्यात आली. विद्युत प्रवाह बंद करून प्रेत बाहेर काढण्यात आले.

साधारणतः विद्युत प्रवाह असलेली तार तुटल्यावर व त्याचा अर्थ ताराशी संपर्क येताच सब स्टेशन मधुन विद्युत प्रवाह खंडित होत असतो. मात्र येथे असे न झाल्याने एका तरुण शेतकऱ्याला आपल्या प्राणाला मुकावे लागले. यामुळे गावात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Recommended read: चंद्रपूरात कोरोना ने दोघांचा मृत्यू

सदर घटना ही महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणा मुळे झाल्याची गावकऱ्यांनी ओरड केली व मृतक कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशीं मागणी केली तेव्हा व वीस हजार रुपये अंत्यविधी साठी व चार लाख आर्थिक मदत म्हणून देण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!