प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथ ने अँकरच्या कानाखाली लावली, व्हिडीओ व्हायरल- IG Media Chandrapur

ऑस्कर पुरस्काराला गालबोट

मुंबई: संपूर्ण जगातील सिनेसृष्टीत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान एका धक्कादायक घटनेने ऑस्कर पुरस्काराला गालबोट लागले आहे. विशेष म्हणजे, ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या इतिहासात हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. या पुरस्कार सोहळ्या दरम्यान अँकर ख्रिस रॉक यांने प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथ यांच्या पत्नी बद्दल अपशब्द वापरल्यामुळे पुरस्कार सोहळ्यातच एक कानाखाली मारली. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

विल स्मिथ Will Smith Oscar

ख्रिस रॉक हा अभिनेता बेस्ट डॉक्युमेंटरीचा पुरस्कार जाहीर करण्यासाठी स्टेजवर आला होता. पण स्टेजवर येता त्याने हास्यविनोद सुरू केले. यामध्ये ख्रिस रॉक ह्याने अभिनेता विल स्मिथची पत्नी जॅडा हिची खिल्ली उडवली, त्यामुळे संतापलेल्या विल स्मिथने स्टेजवर जाऊन रॉकच्या कानाखाली लगावली. अभिनेता विल स्मिथच्या पत्नी जेडा पिंकेट स्मिथ ही देखील या सोहळ्याच्या वेळी विलसोबत तिथे उपस्थित होती.

Recommended read: ज्या व्यक्तीने आग लावली आहे ती आग मी विझविणार- सुधीर मुनंगनटीवार

यावेळी विनोदी अभिनेता ख्रिस रॉक हा स्टेजवर आला. पण येताच त्याने जेडाबाबत टिप्पणी केली. G.I. Jane २ मध्ये तिला पाहण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असे त्याने म्हटले. पण यामुळे संतापलेला विल स्मिथ स्टेजवर पोहोचला आणि त्याने ख्रिस रॉकच्या कानाखाली मारली. यानंतर विल स्मिथ शांतपणे स्टेजखाली गेला. आणि आपल्या खुर्चीवर बसून त्याने क्रिसला आपल्या पत्नीचे नाव न घेण्याचा इशारा ओरडून दिला.

जेडा पिंकेड हिला अलोपेसिया हा आजार झाला आहे. या आजारामुळे तिचे डोक्यावरचे केस गळत आहेत. जेडाने पहिल्यांदाच २०१८ मध्ये यावर जाहीरपणे भाष्य केले होते. अंघोळ करताना केस हातात येत असल्याने आपण केस कापण्याचा निर्णय़ घेतल्याचे तिने सांगितले होते. याचा संदर्भ असल्याने ख्रिस रॉक याने जेडाने नाव घेत G.I. Jane २ या सिनेमाचा उल्लेख केला होता. या सिनेमामध्ये डेमी मूर या कलाकाराने उभे केलेले जॉर्डन नावाने पात्र टक्कल असलेले होते. क्रिसने जेडाच्या आजारपणाची खिल्ली उडवत G.I. Jane २ मध्ये तिला पाहायचे आहे, असे वक्तव्य केले होते. काही क्षणात घडलेल्या या घटनेने प्रेक्षकांना काहीच कळले नाही. पण नंतर विल स्मिथ रडताना दिसला. त्यामुळे हा प्रकार स्क्रिप्टेड नसून अचानक घडल्याचे प्रेक्षकांच्या लक्षात आले.

Recommended read: राजकीय अभिनिवेश बाजूला सारून एसटी संपावर तोडगा काढा

या प्रकारामुळे ऑस्कर पुरस्काराला गालबोट लागले आहे भाष्य केले होते. अंघोळ करताना केस हातात येत असल्याने आपण केस कापण्याचा निर्णय़ घेतल्याचे तिने सांगितले होते. याचा संदर्भ असल्याने ख्रिस रॉक याने जेडाने नाव घेत G.I. Jane २ या सिनेमाचा उल्लेख केला होता. या सिनेमामध्ये डेमी मूर या कलाकाराने उभे केलेले जॉर्डन नावाने पात्र टक्कल असलेले होते. क्रिसने जेडाच्या आजारपणाची खिल्ली उडवत G.I. Jane २ मध्ये तिला पाहायचे आहे, असे वक्तव्य केले होते. काही क्षणात घडलेल्या या घटनेने प्रेक्षकांना काहीच कळले नाही. पण नंतर विल स्मिथ रडताना दिसला. त्यामुळे हा प्रकार स्क्रिप्टेड नसून अचानक घडल्याचे प्रेक्षकांच्या लक्षात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!