कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया: पतीची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार

गोंदिया– दोन अपत्य झाली, तिसरा होऊ नये म्हणून शासनाच्या नियमाचे पालन करीत आपली आर्थिक स्थिती ला लक्षात घेऊन एका पतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करवून घेतली.

मात्र पत्नी आठ महिन्याची गर्भवती असल्याने कुटुंब अडचणीत आले आहे . हा प्रकार येथील सातगाव आरोग्य केंद्र अंतर्गत साखरीटोला येथे घडला.

Recommended read: चंद्रपूर शहरात तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली

प्राप्त माहितीनुसार विवेक गोपीचंद खांदारे यांना दोन अपत्य आहेत. लोकसंख्या धोरणानुसार मर्यादित अपत्य संख्या ठेवण्याची जबाबदारी स्वीकारून अपत्य संख्या वाढू नये यासाठी विवेकने ५ ऑक्टोबर २०२१ ला प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव येथे स्वतः कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करवून घेतली.

डॉ. अभय पाटील यांनी ही शस्त्रक्रिया केली. मात्र यानंतर त्यांची पत्नी आठ महिन्याची गर्भवती आहे. गर्भवती असल्याची बाब दोघा पती-पत्नीला चार महिने झाल्यानंतर कळली तेव्हा ते आरोग्य केंद्रात गेले.

Recommended read: अखेर राजुरा – सास्ती रस्त्यावरील खड्ड्याने घेतला बळी

तालुका वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित खोडणकर यांनी त्यांना के.टी.एस. जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अनेकदा प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क केला मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. डॉक्टरांनी वेळीच योग्य तो सल्ला का दिला नाही. त्यामुळे त्यांनी संतापून याची तक्रार जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस स्टेशन सालेकसा यांच्याकडे करीत कारवाईची मागणी केली आहे.

विवेक खांदारे मोल मजुरीची कामे करून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करतात. स्वतःच्या कमाईत तीन अपत्याचे पालण पोषण करणे शक्य नसल्याने व शासन नियमा नुसार दोनच अपत्य असावे, यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली.

Recommended read: सातबारा वर नाव नोंदणीसाठी लाच घेताना तलाठी व कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

मात्र डॉक्टरांच्या चुकीमुळे तिसरा अपत्य पोटात आहे. तो जन्माला आल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल? असा प्रश्न पती-पत्नीसमोर निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!