गडचिरोली : गावातील सरपंचाच्या मुलाने एका अल्पवयीन प्रेयसीची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत गाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही मुलगी चार दिवसांपासून बेपत्ता होती. दरम्यान, तिचा मृतदेह हाती लागताच सदर संशयित आरोपीने गावातून पलायन केले आहे.


ही घटना दामरंचा पोलीस स्टेशनअंतर्गत भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम (गेर्राटोला) येथे घडली. मीना येर्रा सिडाम (१७ ) असे मृत मुलीचे नाव आहे.

Recommended read: भद्रावती येथील तरुणीच्या मृत्यू चे रहस्य वाढले

मीना ही चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी पोलिसांत केली होती. तिचा शोध सुरू असतानाच गावाजवळच्या शेतात मीनाची चप्पल दिसली. त्यानंतर एका ठिकाणी खड्डा करून माती टाकल्याचे व त्यातून थोडी ओढणी बाहेर आल्याचे दिसले. त्यामुळे लागलीच पोलिसांना माहिती देऊन खड्ड्यातील माती काढली असता मीनाचा मृतदेह आढळला. भामरागडचे तहसीलदार अनमोल कांबळे यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांच्या समक्ष दामरंचा पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. तो मृतदेह बेपत्ता असलेल्या मीनाचाच असल्याची खात्री गावकऱ्यांनी केली. गावचे सरपंच रंगा पोचा मडावी यांच्या मुलाचे आणि सदर मुलीचे प्रेमसंबंध होते, अशी माहिती गावचर्चेवरून पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे सरपंचांचा मुलगा अल्पवयीन प्रेयसीची हत्या करून या घटनेनंतर फरार झाला.

2 thoughts on “अल्पवयीन प्रेयसीची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी जमिनीत पुरला मृतदेह”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!