शेगाव येथे वृध्दाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

शेगाव हत्या प्रकरण :- शिवीगाळ केली म्हणून दगडाने ठेचून केली हत्या

चंद्रपूर: शेगाव येथील ६० वर्षीय वृध्दाच्या दगडाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. सौरभ प्रकाश हिवरे, अतुल मधुकर मडकाम असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.

Recommended read: गुलाबी बोंडअळी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना

चारगाव वनविभागाच्या क्षेत्रातील एका झुडुपात तुळशीराम महाकुलकर नामक वृध्दाचा मृतदेह आढळून आला होता. त्याची हत्या करून मृतदेह झुडुपात फेकण्यात आल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. स्थानिक गुन्हे शाखेला पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते.

Recommended read: दुर्गापूर हत्याकांड प्रकरणी दहा आरोपींना अटक

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयावरून दोघांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता, प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर विश्वासात घेवून विचारणा केली असता, खून केल्याची कबुली दिली. रस्त्याने जात असतांना दारू पिऊन शिवीगह केल्यामुळे हत्या केल्याचे आरोपींने सांगितले. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!