चंद्रपूर: आई ला सातत्याने मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भावाने खून केल्याची घटना नागभीड तालुक्यातील मेंढा (किरमिटी) गावात रविवारी रात्री उशिरा घडली. राकेश शंकर खामदेवे (३२) असे मृतकाचे तर रोषन शंकर खामदेवे (२६) असे आरोपीचे नाव आहे.

Recommended read: Tattoo ने गोंदवणे १४ जणांना पडले महागात

घटना घडली तेव्हा दोघेच भाऊ घरी होते. वडील बाहेरगावी कामाला तर आई सुद्धा बाहेरगावीच गेली होती अशी माहिती आहे. घरी असतांना दोघा भावांमध्ये वाद झाला. नंतर या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. तेव्हढ्यात लहान भावाचा हातात एक काठी सापडली. सापडले आणि या काठीने त्याने मोठ्या भावावर सपासप वार केले. यात मोठा भाऊ मुर्छित पडला. काही वेळातच ही बाब गावात कर्णोपकर्णी झाली.

गावच्या पोलीस पाटलास ही माहिती मिळताच त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोचले आणि रूग्णवाहिकेद्वारे जखमीस उपचारासाठी नागभीडच्या ग्रामीण रूग्णालयात हलविले. त्याचवेळी आरोपीसही ताब्यात घेतले.

Recommended read: सुधीर मुनगंटीवार : वाघ पुन्हा येतोय विकासाचा झंझावात घेऊन

दरम्यान गंभीर जखमी असलेल्या राकेशला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सध्या पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय डी जे बारसागडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!