राज्यातील महविकासआघाडी सरकार अस्थिर

मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल असलेल्या शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये आहेत. त्यांच्यासोबत काही समर्थक आमदार असल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. अशातच शिंदे यांनी एक ट्विट केले आहे.

Recommended read: अग्निपथ योजनेविरोधात चंद्रपूरात आंदोलन

याआधी भाजपा आमदार असलेले संजय कुटे हे शिंदे आणि इतर आमदार असलेल्या ठिकाणी पोहोचले आहेत.

“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असे शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेला सोडचिठ्ठी देईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

एकनाथ शिंदे राजीनामा देणार ?

बंडाळीनंतर शिवसेनेला जबर धक्का बसला. वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली. या बैठकीला केवळ १८ आमदारांनी उपस्थिती लावली. या बैठकीत शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिंदे यांच्याजागी अजय चौधरी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता शिंदे आणि समर्थक मंत्री संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.

3 thoughts on “सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही” एकनाथ शिंदे यांची पाहिली प्रतिक्रिया”
  1. […] दोन मुलीचा मृत्यू, वरवट येथील घटना सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही&#… कुजलेल्या अवस्थेत आढळला मजुराचा […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!