आठ वर्षीय ध्रुवची ' इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ' मध्ये नोंद

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड :टाकाऊपासून विविध वस्तू तयार करण्याचा विक्रम

चंद्रपूर : अवघ्या आठ वर्षांच्या ध्रुव विक्रम अरोरा या मुलाने ‘ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ‘ मध्ये आपली नोंद केली आहे. टाकाऊ वस्तूंपासून तब्बल 17 प्रकारच्या विविध वस्तू तयार करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. याची दखल ‘ India Book of record ‘ने घेतली असून 2022च्या प्रमाणपत्राने ध्रुवला सन्मानित करण्यात आलं. 

Recommend read: तरूणींचा निवस्त्र व धडावेगळा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

विशेष म्हणजे राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची दखल घेत ध्रुवचा सत्कार केला. त्याच्या या कामगिरीचे कौतुक करत प्रोत्साहनाची थाप आणि उज्वल भविष्यासाठीच्या शुभेच्छा मुनगंटीवारांनी याप्रसंगी दिल्या.

ध्रुवने अवघ्या आठव्या वर्षी टाकाऊ वस्तूंपासून तब्बल 17 प्रकारच्या वस्तू तयार केल्या आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग चा प्रयोग आणि सेंद्रिय खते देखील त्याने तयार केली आहेत. सध्या पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा प्रयोग आहे. याचीच दखल राष्ट्रीय ओतलीच्या ‘ India Book of record ‘ने घेतली. त्याच्या विक्रमाची नोंद या रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. याबाबतचे पदक आणि प्रमाणपत्र ध्रुवला मिळाले आहे. इवल्याशा वयात ध्रुवने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

3 thoughts on “आठ वर्षीय ध्रुवची ‘ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ‘ मध्ये नोंद”
  1. चंद्रपुरकरासाठी अभिमानाचा क्षण
    अभिनंदन ध्रुव.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!