चंद्रपूरातील तरूणाई ई सिगारेट च्या विळख्यात

चंद्रपूरात उच्चभ्रू वस्तीतून ई सिगारेट जप्त

चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील रामगनर परिसरातील दुर्गा मंदिराजवळील निशा प्रोव्हीजन व नागपूर रोडवरील टेक्स स्मोकींग या दुकानातून विदेशी बनावटीचे ई सिगारेट व वेब फ्लेवर रामनगर पोलिसांनी छापा टाकून जप्त केले आहे.

२५ ई सिगारेव व वेब फ्लेवर असा एकूण ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दुकान चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Recommended read: राज्यात शिक्षकांची ३१ हजार ४७२ पदे रिक्त

ई सिगारेट व वेब फ्लेवर वर राज्यात बंदी असतांना मोठ्या विक्री होत आहे. या सिगारेटमुळे कर्करोगाचा धोका अधिक असतो. महाविद्यालयीन व शाळकरी विद्याथी्र या ई सिगारेटच्या आहारी गेल्याचे पोलिसांच्या तपासात दिसून आले आहे.

Recommended read: चंद्रपूर मनपा सफाई कामगार निलंबित

रामनगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रामनगर मधील दुर्गा मंदिरासमोरली निशा प्राेव्हिजन व नागपूर रोडवरील टेक्स स्मोकिंग या दोन दुकानात धाड टाकून झडती घेतली असता, अनुक्रमे ६ व १९ असे एकूण २५ ई सिगारेटी आढळून आले. या सर्व जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!