दुर्गापूरात बिबट्याचा हल्ला, आठ वर्षीय बालकांचा मृत्यू-IG Media Chandrapur

महिनाभरातील दुसरी घटना

चंद्रपूर: दुर्गापूर येथील समता नगर परिसरात बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास लहान बालक खेळत असताना बिबट्याने मुलाला उचलून नेवून ठार केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. प्रतीक शेषराव बावणे (८) असे मुलाचे नाव आहे. शरीराचे काही भाग लगतच्या झुडपी जंगलात आढळून आले आहे. वेकोली परिसरात वारंवार बिबट्याचे होत असल्यामुळे राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी वेकोलि कार्यालयाची तोडफोड केली.

भद्रावती तालुक्यातील बेलोरा येथील रहिवासी असलेल्या मुलाचे आजोबा आज बुधवारी सकाळी मृत्यु पावले त्यामुळे सर्व कुंटूब तेजराम मेश्राम (महाराज) यांच्या मृत्यू झाल्याने ते सर्व जण दुर्गापूर येथे आले. मेश्राम यांचे पार्थीव घरीच असल्याने सर्व जण घराच्या समोर बसून होते.तर प्रतीक (नातू) हा घराच्या मागे खेळत होता.तितक्यात बिबट्याने त्या बालकाला फरफटत जंगलात घेऊन गेले. प्रत्यक्षदर्शीनी आरडा ओरडा केल्याने बिबट्याने धुम ठोकली. मात्र त्या बालकाचे बिबट्याने लचके तोडले.त्या बालकांचे वेगवेगळ्या अवयव वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्याची माहिती आहे. दरम्यान या संदर्भात चंद्रपूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कारेकर यांना विचारले असता मुलाचा मृतदेह मिळाल्याची माहिती दिली.

ही या परिसरातील दुसरी घटना आहे. या पूर्वी फेब्रुवारी महिन्यात अशाच प्रकारे बिबट्याने मुलाला उचलून नेले होते.

ताडोबात टी १६१ वाघाचा मृत्यू

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात रेडिओ कॉलर लावलेला सुमारे साडेचार वर्षे वयाचा टी १६१ नर वाघ कारवा रेंजच्या वनखंड क्रमांक २९० मधील आंबेउतारा ओढ्यात मृतावस्थेत आढळून आला. ही घटना बुधवार, ३० मार्च रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गळ्याभोवती झालेल्या जखमेमुळे वाघाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

One thought on “दुर्गापूरात बिबट्याचा हल्ला, आठ वर्षीय बालकांचा मृत्यू, राष्ट्रवादीकडून वेकोलि कार्यालयाची तोडफोड”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!