दिवाळी २०२२ : आतषबाजीला महागाईचे ‘फटाके’

दिवाळी २०२२:- दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

चंद्रपूर: दिवाळी आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणाऱ्या आतषबाजीला यंदा महागाईचे ‘फटाके’ बसले आहेत. विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किंमतीमध्ये १० ते ४० टक्क्यांपर्यंतची मोठी वाढ झाली. त्यामुळे दिवाळीत फटाके खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.

Recommended read: जिल्हा व तालुका पातळीवर दिवाळी फराळ महोत्सव २०२२ आयोजन

करोनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर यंदा सर्वच सण निर्बंधमुक्त आणि उत्साहात साजरे होत आहे. सणांचा राजा म्हणून ओळख असलेला दिवाळी सण १० दिवसांवर आला. दिवाळीच्या तयारीसाठी लगबग सुरू झाली आहे. खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. दिवाळी म्हटली की फटाके आलेच. गेल्या दोन वर्षांत करोना प्रादुर्भावामुळे फटाके विक्रीवर परिणाम झाला.

यंदा नागरिकांमधील उत्साह लक्षात घेता फटाक्यांची विक्री वाढून मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. त्यातच विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. सुतळी बॉम्ब, बुलेट बॉम्ब, पोपट, लवंगी आदी फटाक्यांचे पाच ते १५ टक्क्यांपर्यंतचे दर वाढले. फुलझड्या, झाड, चक्री, रॉकेट या प्रकारच्या नामांकीत व इतर कंपन्यांच्या फटाक्यांच्या किंमतीमध्ये १५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. सर्वाधिक २० ते ४० टक्के दरवाढ आकाशात उडणाऱ्या फटक्यांची झाली आहे. एकूण सर्व प्रकारच्या फटाक्यांची दरवाढ लक्षात घेता सरासरी २० टक्के वाढ झाल्याचे विक्रेते म्हणाले.

Recommended read: चंद्रपूर वीज केंद्र CSTPS राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

यावर्षी फटका विक्री व्यवसायाला विक्रमी दरवाढीचे ग्रहण लागले आहे. फटाके निर्मितीसाठी बेरियम नायट्रेट, अमोनियम नायट्रेट, अल्युमिनियम पावडर, कॉपर कोटेड वायर, सल्फर, रद्दी पेपर, सुतळी अशा कच्चा मालाचा वापर केला जातो. यंदा यापैकी अनेक गोष्टीच्या किंमतीमध्ये लक्षणीय अशी वाढ झाली. शिवाय कामगारांची वाढलेली बेसुमार मजुरी तसेच डिझेल-पेट्रोलच्या किंमतीतील सततच्या वाढीमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च, विजेचे वाढलेले दर या सर्व बाबींमुळे फटाक्यांच्या किंमती वाढल्या आहेत. शिवाय दारूगोळा आणि रसायनांच्या किमती वाढल्याने शिवकाशी येथून मागवलेले फटाके वाढीव दराने बाजारपेठेत आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!