टोमणे मारायची म्हणून मुलीने केली आईची हत्या

घरात शौच केल्याच्या रागात हातरूमालीने गळा आवळून केली हत्या

दिव्यांग मुलींची हत्या: आरोपी बापास अटक

चंद्रपूर: दिव्यांग व मानसिकदृष्ट्या वेडसर असलेल्या १० वर्षीय मुलींची जन्मदात्या बापानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारला उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. विजय नारायण बारापात्रे रा. शामनगर असे आरोपी बापाचे नाव आहे.

Recommended read: धक्कादायक… घुग्घुसमध्ये दिव्यांग मुलीवर अत्याचार

विजय बारापात्रे हे शामनगर येथील रहिवासी असून त्यांना मृणाली नावाची १० वर्षीय दिव्यांग व मानसिकदृष्ट्या वेडसर असलेली मुलगी होती. मृणाली दिव्यांग असल्याने एकाच ठिकाणी पडून राहत होती. घटनेच्या दिवशी २३ सप्टेंबर २०२२ ला मुलींने घरात शौच केली. त्यामुळे संतापलेल्या बापाने हातरूमालाने मुलींचा गळा आवळून निघृणपणे खून केला. दरम्यान आरोपी बापाने नैसर्गिक मृत्यूचा बनाव करीत मुलींला पत्नीच्या मदतीने रूग्णालयात दाखल केले.

Recommended read: माता महाकाली महोत्सवाची परंपरा याच भव्यतेसह अविरत सुरू राहिल – आ. किशोर जोरगेवार

रूग्णालयातील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी घटनेची माहिती पोलिसांन दिली. शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी मर्ग दाखल केला होता. शवविच्छेदन अहवालात मुलींची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे रामनगर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून आरोपींला ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबुल केला आहे.

सदरची कारवाई रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले, पोलिस हवालदार सुदाम राठोड, पोलिस शिपाई मंगेश सायंकार यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!