" त्या" तरूणीचा मृत्यू अपघातातच- पडोली पोलिस

चंद्रपूर: पडोली-घुग्घुस मार्गावरील खुटाळा गावाजजवळील राजस्थान फॅक्ट्रीजवळ भरधार ट्रकने दुचाकीला जबर धडक देवून झालेल्या भीषण अपघातात गर्भवती महिलेसह दोन वषी्रय बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दुपारी ११.४५ वाजताच्या घडली.

Recommended read: शिवसेनेच्या नेतेपदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी

या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. नम्रता निखील टावरी (२५), लक्ष टावरी (२) असे मृतकांचे नाव आहे. तर, निखील टावरी व कनक टावरी असे जखमींचे नावे आहेत. या घटनेमुळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खुटाळा गावातील लहूजी नगरातील निखील टावरी हे पत्नी नम्रता, व लक्ष व कनक या तिघांना घेवून रूग्णालयात जात होते. रूग्णालयात जात असतांना राजस्थान फँक्ट्री जवळ धरभाव वेगात येणाऱ्या ट्रकने टावरी यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

Recommended read: अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ही धडक इतकी जबर होती कि, गर्भवती नम्रता टावरी व दोन वषी्रय लक्ष टावरी चा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, पती निखील टावरी व कनक टावरी हे गंभीर जखमी झाले. दरम्यान घटनास्थळी उपस्थित नागिरकांनी ट्रकचालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसापूर्वी खुटाळा येथील गावकऱ्यांनी अवजड वाहतूक गावातून होवू नये यासाठी पत्रव्यवहार केला होता. मात्र, शनिवारी पुन्हा अवजड वाहनाने गर्भवती महिलेसह दोन वषी्रय बालकास जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे लहूजी नगरात शोककळा पसरली आहे. पडोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास करीत आहे.

2 thoughts on “पडोली-घुग्घुस मार्गावर भीषण अपघात, गर्भवती महिलेसह दोन वर्षीय बालकांचा मृत्यू, खुटाळा गावात शोककळा”
  1. […] – विसापूर मार्गांवर पुलाजवळील घटना पडोली-घुग्घुस मार्गावर भीषण अपघात, ग… शिवसेनेच्या नेतेपदावरून एकनाथ […]

  2. […] – विसापूर मार्गांवर पुलाजवळील घटना पडोली-घुग्घुस मार्गावर भीषण अपघात, ग… शिवसेनेच्या नेतेपदावरून एकनाथ […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!