गडचिरोली : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातेसह बाळाचाही पोटात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी २० जूनला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रमशीला सुनील किरंगे (२१), असे मृत गरोदर महिलेचे नाव आहे.

recommedend read – https://igmedias.com/mother-and-two-daughters-killed-in-lightning-strike/

गरोदर मातांची प्रसूती १०० टक्के शासकीय रुग्णालयात व्हावी याकरिता गरोदर मातांना प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने व गरोदरपणातील आजारामुळे माता व बालमृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे.

कोरची तालुक्यातील भर्रीटोला येथील रहिवासी असलेली रमशीला किरंगे ही महिला गरोदर असल्यामुळे व प्रकृती ठीक नसल्याने आपल्या माहेरी भर्रीटोला येथे आली होती. अचानक श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला उपचाराकरिता कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

recommendend read – https://igmedias.com/eknath-shindes-first-reaction-will-resign/

महिलेची प्रकृती आखणी खालावल्याने उपचारादरम्यान तिचा व बाळाचा पोटातच मृत्यू झाला. दरम्यान, सदर महिलेची तपासणी केली असता तिचा रक्तदाब वाढलेला होता. हिमोग्लोबीनही कमी झाले होते, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशीष विटणकर यांनी दिली. आठव्या महिन्यातच बाळ पोटातच दगावल्याने गडचिरोली जिल्ह्यातील आराेग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

One thought on “गरोदर महिलेसह बाळाचा पोटातच मृत्यू, गडचिरोलीतील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!