२० हजार शेतकरी बाधित

चंद्रपूर: जिल्ह्यात मागील सहा दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊसाने उसंत घेतली आहे. मात्र, ढगाळ वातावरण असल्याने पाऊस येण्याची शक्यता आहे. सहा दिवसापासून आलेल्या पाऊसाने वैनगंगा, वर्धा, इरई नदी व लहान मोठ्या नाल्यांना पूर आला आहे. या पुरामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल १७ हजार ६५२ हेक्टर वरील सोयाबीन व कापूस अश्या शेतपिकांचे नुकसान झाले आहे.

बळीराजा हवालदिल झाला असून दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.मागील ८ जुलैपासून राज्यभरासह जिल्ह्यात संततधार व मुसळधार पाऊस आला. या पाऊसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे वैनगंगा, इरई, वर्धा नदीसह लहान मोठ्या नाल्यांना पूर आला आहे.

Recommended read: पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यु

राजुरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, वरोरा, मुल, भद्रावती, चंद्रपूर, सिंदेवाही, नागभीड, कोरपना तालुक्यात शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या पुरामुळे जिल्ह्यातील तब्बल १७ हजार ६५२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबिन व कापूस पिकांचा समावेश आहे. ६ हजार ५३५ हेक्टरवरील सोयाबिन पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये ७ हजार ६५४ शेतकरी बाधित झाले आहे. तर ८ हजार ५७८ हेक्टरवरीलकापूस पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. यात ८ हजार २९१ शेतकरी बाधित झाले आहे. तसेच काही भागात धान व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

जून महिण्यांत पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी कापसू व सोयाबिन पिकांची लागवड केली होती. त्यानंतर पाऊसाने दळी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. याही परिस्थितीत शेतकरी कसाबसा सावरला असतांना मागील सहा दिवसापासून पडलेल्या मुसळधार पाऊसाने शेती पूर्णत: पाण्याखाली आल्याने मोठे नुकसान झाले असुन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढावली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. उसनेवारी व कर्ज घेवून शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, या पुरामुळे संपूर्ण शेती उध्द्स्त झाली आहे.

Recommended read: सकमुरचा शेतकरी ठरला MSEB च्या निष्काळजीपणाचा बळी

वैनगंगा, वर्धा व इरई नदीकाठावरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. १७ हजार ६५२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाल्याची ही प्राथमिक आकडेवारी असूून यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी सांगितले. पंचनामे करण्यास सुरूवात करण्यात आली असून पुराचे पाणी ओसरल्यानंतर पंचनाम्यांना वेग येणार आहे.

*५०० हून अधिक घराची पडझड*

सहा दिवसाच्या मुसळधार पाऊसामुळे जिल्हाभरात ५०० हून अधिक घराची पडझड झाली असनू लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे. घराची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. शासनाने त्वरीत मदत करण्याची मागणी होत आहे.

चंद्रपूर शहरात १०००हून अधिक घरात पुराचे पाणी, लाखो रूपयांचे नुकसान

मुसळधार पाऊस झाल्याने इरई धरणाची पाणीपातळी वाढल्याने धरणाचे सात दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे इरई धरणातून पाण्याच्या विसर्गामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील रहमत नगर, दाताळा, हवेली कॉम्प्लेक्स, सिस्टर कॉलनी, बनगरवाडा आणि शहरातील सखल भागात पूरस्थिती निर्माण हाेवून हजारो नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने १००० हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. घरात पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूसह इतर वस्तू भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!