चंद्रपूर वीज केंद्र CSTPS राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

CSTPS : वॉटर ऑप्टिमायझेशन २०२२ पुरस्कार

चंद्रपूर : पाण्याचा काटकसरीने विशेषतः कमीतकमी वापर केल्याबद्दल चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला ( CSTPS ) नुकतेच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Recommended read: चंद्रपूरातील तरूणाई ई-सिगारेटच्या विळख्यात

मिशन एनर्जी फाऊंडेशन द्वारे ‘वॉटर ऑप्टिमायझेशन २०२२’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन ८ व ९ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. यामध्ये वीज केंद्राला हा पुरस्कार देण्यात आला. २९२० मेगावाट स्थापित क्षमता असलेल्या CSTPS चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी वापराचे अनेक अडथळे, आव्हानांवर मात करीत सूक्ष्म नियोजन केले.

Recommended read: राज्यात शिक्षकांची ३१ हजार ४७२ पदे रिक्त

महानिर्मितीचे कार्यकारी संचालक पंकज सपाटे, उप मुख्य अभियंता मदन अहिरकर, विजया बोरकर, राजेश राजगडकर, अनिल पुनसे, अधीक्षक अभियंता पुरुषोत्तम उपासे,सुहास जाधव, फनिंद्र नाखले, प्रभारी कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ रमेश भेंडेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!