सीआरपीएफ जवानाची गोळ्या घालून आत्महत्या IG Media Chandrapur

पत्नीच्या मृत्यूची बातमी सहन न झाल्याने

गडचिरोली: पत्नीने आत्महत्या केल्यामुळे खचलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११३ व्या तुकडीच्या जवानाने स्वतःच्या रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. सीआरपीएफ चंद्रभूषण ध्यानचंद जगत (२८) रा.कुकुदीरकेरा जिल्हा बिलासपुर, छत्तीसगड असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.

Recommended read: आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची गळफास घेवून आत्महत्या

चंद्रभूषण हा केंद्रीय राखीव पोलीस दलात ( सीआरपीएफ ) २०१७ साली भरती झाला होता .याआधी तो छत्तीसगढ मध्ये सेवा देत होता .पाच महिन्यापूर्वी त्याची धानोरा येथे बदली झाली होती. सिआरपिएफ ११३ बटालियन ई कैम्प येथे तो कार्यरत होता. आज सकाळी तो कॅम्प मध्येच ड्युटीवर असताना स्वतःच्या रायफल ने गळयावर गोळी झाडून आत्महत्या केली. आज सकाळी त्याला त्याच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी कळताच,पत्नीच्या विरहात त्यानेही रायफलने गोळी मारून आपली जीवनयात्रा संपविली .

सदर घटनेचा मौका पंचनामा करुण अधिक तपास धानोरा पोलिस करीत असून जवानाचा मृतदेह शवविच्छेदन गडचिरोली येथे करून जवानाचा मृतदेह त्याच्या मुळगावी पाठविण्यात येणार आहे.

2 thoughts on “सीआरपीएफ जवानाची गोळ्या घालून आत्महत्या”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!