अग्नीशस्त्रासह पाच जिवंत काडतुसे जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चंद्रपूर: सराईत गुन्हेगार असलेल्या प्रमोद रामलाल सुर्यवंशी युवकाने दुर्गापूर परिसरात अग्नीशस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. युवकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली असून त्यांच्याकडून देशी बनावटींचा लोखंडी माउजर असलेला एक अग्नीशस्त्र व पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

प्रमोद रामलाल सुर्यवंशी असे अटकेतील युवकांचे नाव आहे. दरम्यान आरोपी खुनाच्या तयारीत होता अशी माहिती समोर आली आहे.

Recommended read: ओबीसीनी भोंगे लावने काढण्याच्या भानगडीत पडू नये : ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

सुर्यवंशी हा सराईत गुन्हेगार असून अग्नीशस्त्राच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुर्गापूर परिसरात सापळा रचून युवकास विचारपूस केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली. दरम्यान पोलिसांनी त्यांनी अंगझडती घेतली असता, त्यांच्या कमरेखाली एक देशी बनावटीचा अग्नीशस्त्र व पाच जिवंत काडतुसे आढळून आले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, दुर्गापूर परिसरात काही दिवसापूर्वी वाद झाला होता. कारागृहातून आलेल्या एका युवकाने प्रमोद सुर्यवंशी यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे सूर्यवंशी यांने त्या युवकांचा काटा काढण्यासाठी अग्नीशस्त्र जवळ बाळगून असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहायक पोलिस निरीक्षक संदिप कापडे, जितेंद्र बोबडे यांच्या पथकाने केली आहे.

2 thoughts on “बंदुकीव्दारे खुनाच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांस अटक”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!