श्री संत गुलाबदास महाराज मठाच्या जुन्या इमारतीवरून वाद

चंद्रपूर : मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव तथा युवा नेते राहुल पुगलिया, रोहित पुगलिया, हेमंत आक्केवार व राजेश काशीयावाले यांच्यासह एकूण १२ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

बालाजी वॉर्डातील श्री संत गुलाबदास महाराज मठाच्या जुन्या इमारतीवरून उद्भवलेल्या वादातून हा प्रकार घडला. येथील बालाजी वॉर्डात श्री संत गुलाबदास महाराज मठाची जुनी इमारत आहे. मुसळधार पावसात या मठाची भिंत काही दिवसांपूर्वी कोसळली. युवा नेते राहुल पुगलिया अध्यक्ष असलेल्या शारदोत्सव मंडळाच्या वतीने येथे १५ वर्षांपासून घटस्थापनेच्या दिवशी शारदादेवीची प्रतिष्ठापना केली जाते.

Recommended read: भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी मनपाला लुटले – पप्पू देशमुख यांचा आरोप

पुगलिया बंधूंसह १२ जणांवर गुन्हे

नवरात्री जवळ येत असल्याने मठाच्या पडलेल्या भिंतीचा मलबा उचलण्याचे काम राहुल, रोहित, हेमंत, राजेश यांच्यासह दहा ते बारा जण करीत होते. किशोर कपूर व ॲड. मुकुंद टंडन हे मठाचे विश्वस्त आहेत. भिंतीचा मलबा साफ करीत असताना किशोर कपूर यांनी ‘तुम्ही विश्वस्त नसतानासुद्धा भिंत तोडून मलबा का नेत आहात’, अशा शब्दात त्यांना हटकले. यावरून राहुल पुगलिया यांनी लोकांना भडकावले तथा शिवीगाळ व मारहाण करण्यास सांगितले, अशी तक्रार कपूर यांनी शहर पोलीस ठाण्यात केली.

Recommended read: वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी

यावेळी हेमंत आक्केवार, रोहित पुगलिया, राजेश काशीयावाले यांनी कपूर यांना हातबुक्क्यांनी व चपलांनी मारहाण केली. तसेच राहुल यांनी मुकुंद टंडन यांच्या हातातील भ्रमणध्वनी हिसकावला. पोलीस ठाण्यात जाताच त्यांनी भ्रमणध्वनीमधील चित्रफीत नाहिशी करून परत केला. त्या भ्रमणध्वनीत घटनेचे चित्रीकरण होते. संबंधितांनी आम्हाला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच मठात दुसऱ्यांदा आला तर मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार कपूर व टंडन यांनी शहर पोलीस ठाण्यात केली.

तक्रारीच्या आधारावरून शहर पोलीस ठाण्यात राहुल व रोहित पुगलिया, आक्केवार, राजेश काशीयावाले यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल यांना विचारणा केली असता, नवरात्रोत्सवात देवीची घटस्थापना असल्याने तिथे स्वच्छतेचे काम सुरू होते. त्याच वेळी कपूर व टंडन यांनी शिवीगाळ केली.

ॲड. टंडन व कपूर यांच्याविरुद्धही गुन्हा

वॉर्डातील महिलांनादेखील शिवीगाळ केली. ज्येष्ठांकडून झालेला हा प्रकार वाईट आहे, असे ते म्हणाले.ॲड. टंडन व कपूर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखलयाप्रकरणी शांताबाई मदनलाल कासीयावाले या महिलेच्या तक्रारीवरून ॲड. मुकुंद टंडन व किशोर कपूर या दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Recommended read: चंद्रपूर मनपा तील अडीच नको, पाच वर्षांच्या गैरकारभाराची व्हावी चौकशी

महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, टंडन आणि कपूर यांनी मठातील गोपालकृष्ण मंदिरात पूजा करू नका आणि मंदिरात येऊ नका, असे म्हणत मला धक्का दिला. धक्क्यामुळे खाली पडत असताना मठात राहणाऱ्या एका महिलेने मला सावरले. तिलाही या दोघांनी केस पकडून मारहाण केली. मठाची खोली रिकामी करून द्या, असे म्हणत तिला धक्काबुक्की केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!