आरोपींना बेदम माहरण केल्याप्रकरणी ठाणेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

ठाणेदाराविरुद्ध गुन्हा दाखल :३२४ अन्वये गुन्हा दाखल

चंद्रपूर: बनावट कागदपत्रे सादर करून शेतीसाठी कर्ज घेणाऱ्या आरोपीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने जिवती तालुक्यातील पाटण पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक शहाजी घोडके यांच्यावर गुन्हा दाखल. भारतीय दंडविधान कलम ३२४ अन्वये ठाणेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

Recommended read: तीन महिण्यांपूर्वीच्या हत्येचा कॉल रेकार्डिंग मुळे भंडाफोड

जिवती तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाटण शाखेत १४ शेतकऱ्यांनी बनावट सातबारा व इतर कागदपत्रे दाखवून १३ लाख ७८ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यासाठी त्यांनी बनावट शिक्के वापरून सातबारा, आठ अ, चेंज रजिस्टर अशी बनावट कागदपत्रे बनवून बँकेची फसवणूक केली.

बँकेने ही कागदपत्रे पुन्हा तपासली असता ती बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे बँकेने पाटण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाटण पोलिसांनी १४ शेतकऱ्यांविरुद्ध कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Recommended read: शेगाव येथे वृध्दाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

दरम्यान पाटणच्या ठाणेदाराने मारोती बोंबीलवार यांना पोलीस ठाण्यात व सगणापूर येथील घरी बेदम मारहाण केली. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयाला मारहाणी बाब लक्षात येताच गोपनीय वैद्यकीय अहवाल मागविला. अहवालात बेदम मारहाण केल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने ठाणेदाराविरुद्ध भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!