अपघातात क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स यांचे निधन

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स ने जगाचा निरोप घेतला आहे. शनिवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे.

Recommended read: ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाच्या बनावट संकेतस्थळाव्दारे पर्यटकांची फसवणूक

टाऊन्सविले येथे त्याच्या कारला अपघात झाला. या अपघातात जगातील दिग्गज क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्स कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. या अपघातामुळे जगाने एक महान क्रिकेटपटू गमावला.

अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यांना वाचवता आले नाही. त्याची कार रस्त्यावर पलटी होऊन गंभीर जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. अल्पावधीतच ऑस्ट्रेलियन क्रीडा जगतातील आणखी एका दिग्गज खेळाडूने जगाचा निरोप घेतला. उल्लेखनीय आहे की, नुकतेच ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध खेळाडू शेन वॉर्नचेही निधन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!