चंद्रपूर: जनावराना चराईसाठी घेऊन गेलेल्या गुरख्यावर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना बफर क्षेत्रातील महादवाडी येथे रविवारी घडली. शामराव जुमनाके (50) वर्षं रा. महादवाडी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे.

Recommended read: गणपती विसर्जनासाठी गेलेला ट्रक्टर उलटून एका महिलेचा मृत्यू

चंद्रपूर तालुक्यातील महादवाडी येथील शामराव जुमनाके हे आपले जनावरे चराईसाठी गावालगाच्या जंगलात गेला होता. तिथे दबा धरून बसलेल्या वाघाने शामराव जुमनाके यांच्यावर हल्ला केला.

Recommended read: अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याची जमावाने केली हत्या

सदर घटनाची माहिती गावकऱ्यांना होताच वनविभागाला माहिती दिली असून, वाघाच्या सततच्या हल्ल्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत.

वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!