सातत्यपूर्ण अभ्यास हीच यशाची गुरुकिली- आशिष बोरकर- IG Media Chandrapur

स्पर्धा परीक्षेच्या युवकांशी साधला संवाद

चंद्रपूर : अभ्यासाचे मोठे बरडण आहे, असा विचार न करता विशिष्ट ध्येय ठरवून नियोजनबद्ध पद्धतीने एन्जॅाय करत अभ्यास करा, यश नक्कीच तुमच्या पायाशी लोटांगण घालेल, असा यशाची गुरुकिली चा मुलमंत्र सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला. गुरुवारी त्यांनी सावली येथील जयभीम वाचनालयात सदिच्छा भेट देऊन अभ्यासिकेतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांशी संवाद साधला.

Recommended read: दुकानाची पाटी मराठीत असणे अनिवार्य, अन्यथा कारवाई

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष तथा जयभीम वाचनालयाच्या अध्यक्ष लता लाकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक नितेश रस्से, लोकमतचे उपसंपादक परिमल डोहणे आदी उपस्थित होते. यावेळी जयभीम वाचनालयाच्या वतीने ठाणेदार आशिष बोरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ठाणेदार बोरकर यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करायचा, वेळेचे नियोजन कसे करायचे, नोट्स कशा काढायचे याबाबत मार्गदर्शन करताना विशिष्ट ध्येय ठरवून ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण प्रयत्न करा, अभ्यासात कोणतीही अडचण आल्यास आपण पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. वाचनालयातील ग्रंथसाठा बघून तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी गाठलेली उंची ऐकूण ठाणेदारांनी वाचनालयाचे कौतुक केले. तसेच स्वत:ही स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक अशी मासिके पुरविण्याचे आश्वासन दिले.

यशाची गुरुकिली

नगराध्यक्ष लता लाकडे यांनी अपयश आले तर खचू नका, जिद्दीने अभ्यास करा, यश नक्कीच मिळेल, असे मार्गदर्शन केले. संचालन प्रद्युत डोहणे यांनी केले. कार्यक्रमाला वाचनालयाचे ग्रंथपाल डिलक्स डोहणे, पुष्पकांत डोंगरे, लोकेश बोरकर, दुधाराम गेडाम यासोबतच अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांची उपस्थितीत होती.

If there is a will, there is a way

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!