मजुराकडून बांधकाम कंत्राटदारांची हत्या

झोपेत असलेल्या मजुरांला उठविण्यासाठी बांधकाम कंत्राटदाराने दोन कानशिलात लगाविल्याने मजूराने केला खून

चंद्रपूर: झोपलेल्या मजुराला उठविण्यासाठी बांधकाम कंत्राटदाराने मजुराच्या कानशिलात दोन थापडा लगाविल्याने संतापलेल्या मजुराने चक्क बांधकाम कंत्राटदाराला लाथा बुक्यांनी जबर मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील श्री टॉकीज परिसरात घडली.

समीर रत्नाकर भोयर असे मृत बांधकाम कंत्राटदाराचे नाव आहे. तर गजानन अल्लारवार असे आरोपी मजुरांचे नाव आहे.

Recommended read: वडिलांनी विष पाजून दोन मुलांचा आवळला गळा

नवीन कामे हातात घेतल्यावर समीर भोयर हा मजुरांना काम देवून कामे करवून घ्यायचा. समीर हा ३ सप्टेंबरला श्री टाॅकीज परिरसरात गेला असता, त्याला गजानन अल्लारवार हा झोपून असल्याचे दिसून आले. त्याला उठविण्यासाठी समीरने मजुराच्या कानशिलात लगावली. दरम्यान गजानन ने मारले का म्हणून समीरला लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत समीरच्या गुप्तांगाला जबर मार लागल्याने घटनास्थळी समीरचा मृत्यू झाला.

Recommended read: विविध प्राधिकरणाच्या निवडणुका महाराष्ट्रात सर्वात प्रथम घेणारे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातले पहिले विद्यापीठ

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल होवून मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी गजानन अल्लारवार याला अटक केली आहे. सदरची कारवाई शहर पोलिसांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!