काँग्रेसचा महानगर अध्यक्ष कुणाल रामटेके अडकले विनयभंगाचा गुन्हात

चंद्रपूर: विवाहीत महीलेनं केलेल्या तक्रारीवरून कांग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या चंद्रपूर महानगर अध्यक्षाला विनयभंगाचा गुन्हात पोलीसांनी अटक केली आहे. कुणाल रामटेके असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे.

शहरातील भिवापूर वार्डात राहणाऱ्या फिर्यादी महिलेचा पतीसोबत वाद झाला होता.याबाबत महिला तक्रार निवारण केंद्रात समुपदेशनासाठी महीला गेली होती.फिर्यादी महिलेच्या नातेवाईकामार्फत कुणाल रामटेके यांची ओळख महिलेसोबत झाली. रामटेके यांनी स्वतःला तक्रार निवारण केंद्रातील कर्मचारी असल्याचे त्या महिलेसमोर दर्शविले.आता मी तुमचं समुपदेशन करण्यासाठी येणार असेही सांगितले.
कुणाल रामटेके यांनी महिलेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.तिला व्हाट्सअप्प द्वारे सतत प्रेमाचा आलाप करीत संदेश पाठवीत होता. असे महीलेने तक्रारीत म्हटले आहे.रामटेके यांचं कृत्य आवाक्याबाहेर होताच महिलेने शहर पोलीस स्टेशन गाठले. तक्रार नोंदवली. तक्रारीचा आधारे पोलीसांनी रामटेके याला अटक केली आहे.या प्रकाराने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.

One thought on “संतापजनक…! काँग्रेसचा महानगर अध्यक्ष कुणाल रामटेके अडकले विनयभंगाचा गुन्हात”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!