चंद्रपूर: जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना शेतमालाच्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला.

या नुकसान भरपाई साठी जिल्ह्याला आता ३१० कोटी ९८ लक्ष ९१४ रुपयांचा निधी २२ सप्टेंबर २०२२ रोजी प्राप्त झाला आहे.

Recommended read: लम्पी स्कीन डिसीज ने चंद्रपूर जिल्ह्यातील ८ गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित

जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेतपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीकरीता बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ३०२ कोटी रुपयांची आणि वाढीव ८ कोटी ९५ लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्याला आता ३१० कोटी ९८लक्ष ९१४ रुपये प्राप्त झाले आहे.

Recommended read: शासकीय अभियांत्रिकीत टाटा टेक्नॉलॉजीचा २६३ कोटींचा ‘ CIIIT ट्रेनिंग ’ प्रकल्प

यात बल्लारपूर तालुक्यासाठी ८ कोटी ८१ लक्ष रुपये, ब्रम्हपूरी तालुक्यासाठी २४ कोटी ३४ लक्ष, नागभीड १ कोटी ६ लक्ष, चंद्रपूर २० कोटी ९५ लक्ष, चिमूर ४१ कोटी ६८ लक्ष, सिंदेवाही ५१ लक्ष, गोंडपिपरी ९ कोटी ६४ लक्ष, पोंभुर्णा ५ कोटी ८६ लक्ष, मूल १७ कोटी ४० लक्ष, सावली १६ कोटी ५ लक्ष, जिवती १० कोटी ८६ लक्ष, कोरपना १३ कोटी २ लक्ष, राजुरा १६ कोटी २५ लक्ष, भद्रावती ४५ कोटी २६ लक्ष आणि वरोरा तालुक्यासाठी ७९ कोटी २३ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सदर निधी तहसीलदार यांना तालुकानिहाय अर्थसंकल्पीय प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे.

तहसीलदार यांनी शासन निर्णय व शासन पत्रान्वये दिलेल्या सुचनेनुसार अटी व शतीच्या अधीन राहून निधी तातडीने वितरीत करावा. सदर रकमेचे वाटप पूर्ण झाल्यानंतर रक्कम वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या रकमेच्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

Recommended read: चोरट्यांनी केली युवकाची हत्या

जिल्ह्यात जुन, जुलै व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे एकूण २ लक्ष २१ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावरील शेतमालाचे नुकसान झाले होते. यात बाधित शेतकऱ्यांची संख्या २ लक्ष ३० हजार ३६२ असून एकूण बाधित गावांची संख्या १३८२ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!