चंद्रपूर: शेतात कोंबड्याच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत शॉकने कोंबडी चाेरण्यासाठी गेलेल्या चोरट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी चंद्रपूर शहरालगत असलेल्या अजयपूर येथे उघडकीस आली आहे.

Recommended read: आनंद नागरी बँक : घर एकाचं, कर्ज दिलं दुसऱ्यांला

याप्रकरणी शेतमालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अमोल मारोती नागरकर ३२ असे मृतक युवकांचे नाव आहे.

दिवाकर मारोती नागरकर यांचे अजयपूर येथे शेत आहे. या शेतात त्यांनी कोंबडीचा व्यवसाय सुरू केला होता. रात्री कोंबड्याचे इतर प्राण्यापासून सरंक्षण व्हावे यासाठी परिसरात विद्युत शॉक लावला होता. दरम्यान अमोल नागरकर हा कोंबडी चोरण्याच्या उद्देशाने शेतात गेला असता, वीजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २० सप्टेंबरला घडली. दरम्यान आरोपींने मृतदेह एका पडीत जागेत लपवून ठेवला होता.

Recommended read: महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना

पोलिसांनी मर्ग दाखल करून तपासाला सुरूवात केली. गोपनिय माहिती व अधिक तपास केला असता, आरोपी दिवाकर नागरकर यांनी विद्युक धक्क्याने मृत्यू झाल्याची कबुली दिली. पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून नागरकर यास अटक केली आहे. सदरची कारवाई रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस.बी.गोपाले व पोलिस हवालदार सुदाम राठोड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!