सीबीआय कडून कोळसा खाणीच्या व्यवस्थापकाला ५० हजारांची लाच घेताना अटक

चंद्रपूर: वेकोलीमधील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून ५० हजारांची लाच घेताना महाकाली भूमिगत कोळसा खाणीचे व्यवस्थापक एस. एम. धांडे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई नागपूर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केली आहे. कारवाईनंतर आरोपी व्यवस्थापकाच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Recommended read: जीर्ण इमारत कोसळून महिला जंखमी झाल्यानंतर चंद्रपूर महानगरपालिकेला जाग

चंद्रपूर जिल्ह्यातील आणि शहराला लागून असलेल्या महाकाली भूमिगत कोळसा खाणीतून सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याला वेकोलिकडून ग्रॅच्युइटी म्हणून २० लाख रुपये घ्यायचे होते. महाकाली खाणीचे व्यवस्थापक एम. एम. धांडे यांनी ग्रॅच्युइटी मंजुरीसाठी ५० हजारांची लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांने सीबीआय नागपूरकडे तक्रार दाखल केली. गुरूवारी सीबीआयने सापळा रचून खाणीजवळ व्यवस्थापक धांडे याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक केली.

Recommended read: चंद्रपुरातील OYO हॉटेलमध्ये वेशाव्यवसाय

त्यानंतर आरोपी व्यवस्थापकाच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेण्यात आली. मागील दोन महिन्यांत सीबीआयने वेकोलीच्या अनेक लाचखोर अधिकाऱ्यांना पकडले आहे. सीबीआयच्या कारवाईमुळे वेकोलीमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!