जिल्ह्यात कोळसा माफिया सुसाट- IG Media chandrapur

कोळश्याची हेराफेरी करणाऱ्या कोळसा माफिया वर कारवाई करण्याची मनसेची मागणी

चंद्रपूर :जिल्ह्यात कोळसा खदाणीतून येणाऱ्या चांगल्या दर्जाच्या कोळश्यात चुरी व स्टील कंपनीच्या टाकाऊ माल मिसळवून तो विकण्याची नवी शक्कल चंद्रपुरात कोळसा माफिया नी शोधून काढली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोळसा चोरी करून मोठे झालेले कोळसा माफिया आता खराब निघालेला माल मिसळून दिवसाला हजारो टन खराब कोळसा औष्णिक विद्युत केंद्रांना विकत आहे.

Recommended read: ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात ८ मे ला बैठक

या माफियांना आळा घालता यावा व कोळशाच्या गैरव्यवहार करणाऱ्या संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी हा चोरीचा प्रश्न विधानपरिषदेत तारांकित प्रश्नात घ्यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राविष सिंह, जिल्हापरिषद सदस्य प्रवीण सूर यांनी विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांची मुंबई येथे भेट घेतली व कारवाई करण्याची मागणी केली.

Recommended read: चंद्रपूरात तिसरे फुले-शाहू-आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलन ८ मे ला

तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची देखील लवकरच भेट घेऊन जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेल्या कोळशाच्या चोरीची विस्तृत माहिती देणार असून येणाऱ्या अधिवेशनात प्रश्न उचलण्याची मागणी मनसे करणार आहे. स्थानिक प्रशासन व नेते यांच्या कृपेने ही चोरी सुरू असल्याने मुद्दाम डोळेझाक होत असून यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा देखील इशारा यावेळी मनसेने दिला.

2 thoughts on “जिल्ह्यात कोळसा माफिया सुसाट”
  1. […] तरूणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी जिल्ह्यात कोळसा माफिया सुसाट ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात […]

  2. […] तरूणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी जिल्ह्यात कोळसा माफिया सुसाट ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!