भाचीच्या लग्नात हरणाचे मांस खाऊ घालण्याचा हट्ट पडला महागात

हरणाच्या शिकारीदरम्यान पोलीस व शिकाऱ्यांमध्ये चकमक

तीन पोलिस जवान शहीद

दोन शिकारी इन काउंटर मध्ये ठार

गुना: मध्य प्रदेशातील गुना येथे शनिवारी पहाटे पाहुण्यांना हरणाचे मांस खाऊ घालण्यासाठी काळ्या हरणांची शिकार करण्यासाठी आलेले शिकारी आणि पोलिसांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत एका SI सह तीन पोलीस जवान शहीद झाले तर दोन हल्लेखोर शिकाऱ्यांना  इनकाउंटर मध्ये ठार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, भाचीच्या लग्नात आलोल्या पाहुण्यांना हरणाचे मांस खाऊ घालण्यासाठी ही शिकार करण्यात आली. शिकारी नौशाद याच्या भाचीचे शनिवारी लग्न होते. नौशाद याने लग्नात आलेल्या पाहुण्यांना वन्य प्राण्यांचे मांस खाऊ घालायचे ठरवले.

Recommended read: मद्यपींनो सावधान….. ग्राहकांच्या पोटात मुदतबाह्य दारू

यासाठी तो आपल्या साथीदारांसह जंगलात गेला आणि पाच हरीण आणि एका मोराची शिकार केली. प्राण्यांना घेऊन दुचाकीवरून परतत असताना त्यांचा सामना पोलिसांशी झाला. यावेळी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळ्या चालवल्या.

या गोळीबारात तीन पोलिसांचा मृत्यू झाल, तर नौशाद तिथेच मारला गेला, तर त्याचा साथीदार शहजाद दुसऱ्या चकमकीत ठार झाला. पोलिस तिसऱ्या साथीदाराचा शोध घेत आहेत.या घटनेत इन्स्पेक्टर राजकुमार जाटव, कॉन्स्टेबल नीरज भार्गव आणि कॉन्स्टेबल संतराम शहीद झाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पळून गेलेल्या आरोपींची ओळख पटली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

One thought on “भाचीच्या लग्नात हरणाचे मांस खाऊ घालण्याचा हट्ट पडला महागात”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!