पाणीटंचाई चंद्रपूर- IG Media Chandrapur

पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती

चंद्रपूर महानगरपालिका पदाधिकारी व अधिकारी निद्रावस्थेत

चंद्रपूर : शहरातील तापमान ४० अंश सेल्सीअसच्या वर गेले असतांना मागील सात दिवसापासून शहरातील पाणीपुरवठा बंद आहे त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. बुधवारी काही भागात पाणी आले मात्र, तेही गढूळ आल्याने नागरिक संतापले आहे. अनेकांना तर बाटलीबंद पाण्यावर दिवस काढावे लागत आहे तर शहरातील जार विक्रेते प्रती कॅन पन्नास रुपये आकारत असल्याने नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. मागील सहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असून देखील चंद्रपूर महानगरपालिका निद्रावस्थेत असून नागरिकांच्या समस्यांची सोयरसुतक नसल्याचे यावरून दिसून येते आहे.

Recommended read: मनपाच्या नाकर्तेपणामुळे चंद्रपूरकांचा घसा कोरडा

इरई धरणातील पाण्याचा शहराला पुरवठा केला जातो. पाइप लिकेजमुळे शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, सहा दिवस लोटूनही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात मनपा प्रशासनाला यश आले नाही. ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा ठप्प असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा सहा दिवसांपासून ठप्प असताना महानगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना काहीएक देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर महानगरपालिका च्या या नाकर्तेपणामुळे नागरिक संतापले आहे. काँग्रेस, मनसे, मनपातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून देखील यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मनपाचे पदाधिकारी व अधिकारी पाणी प्रश्नावर गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

One thought on “चंद्रपूर महानगरपालिका निद्रावस्थेत : सहाव्या दिवशी चंद्रपूरकांचा घसा कोरडा”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!