भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे व मुंबई भाजपा अध्यक्षपदी आशिष शेलार

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. तसेच त्यांनी मुंबई भाजपा अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती केली.

Recommended read: गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीला आंंतरराष्ट्रीय पुरस्कार

उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस व राज्याचे मंत्री तथा मावळते प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मा. चंद्रशेखर बावनकुळे व मा. आशिष शेलार यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

मा. चंद्रशेखर बावनकुळे विधान परिषद सदस्य आहेत. ते नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी डिसेंबर २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी २००४, २००९ व २०१४ अशी तीनवेळा कामठी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. ते १९९७ व २००२ साली नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते.

Recommended read: मंत्रिमंडळाचा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय

सध्या ते पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांनी यापूर्वी भाजपा प्रदेश सचिव, नागपूर जिल्हाध्यक्ष, नागपूर जिल्हा सचिव आणि नागपूर जिल्हा भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यांनी १९९० ते १९९५ या कालावधीत अखिल महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त बेरोजगार समितीचे कार्य केले. कोराडी वीज प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिला होता व आंदोलनात अटक झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!