मुदत ठेवीच्या नावावर करोडोची फसवणूक

चंद्रपूर: बँकेत मुदत ठेव केल्यास जास्त व्याज मिळणार या आमिषाला बळी पडत साखरी येथील काही नागरिकांनी गावातीलच नितेश नामक युवकावर विश्वास ठेवत करोडो रुपयात फसविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.

नितेशचा सांगण्याप्रमाणे बँक ऑफ इंडिया शाखा वनसडी येथिल बँकेत नविन योजना आली असून यात मुदत ठेव केल्यास जास्त प्रमाणात मासिक व्याज मिळणार असल्याचे सांगून दहा ते बारा नागरिकांना करोडो रुपयात फसविल्याची घटना उघडकीस आली असून त्या विरोधात काही नागरिकांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर काही नागरिक परत पैसे देणार या भरोशावर अजूनही वाट पाहत आहे.

Recommended read: अकबर ,औरंगजेबाची चांदीची नाणी चंद्रपुरात सापडली

राजुरा तालुक्यात साखरी येथे वेकोलीचा पोवानी-२ व पोवनी-३ प्रकल्प आला आणि पहिल्यांदा प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला जास्त प्रमाणात दिला. यामुळे साखरी गाव हे जिल्ह्यात करोडपती गाव म्हणून प्रसिद्ध झाले होते.

या प्रकल्पात अनेकांच्या जमिनी वेकोलीने अधिग्रहित केल्या असून त्याच्या मोबदल्यात काहींना करोडो रुपये मिळाले आहे. काहींनी मिळालेल्या राशीची योग्य गुंतवणूक केली तर बहुतांश नागरिकांनी मिळालेली रक्कम वेगवेगळ्या बँकेत ठेवलेली आहे.

Recommended read: वनमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला

करोडो रुपयाचा चुना

साखरी येथील नीतेश हा युवक बँक ऑफ इंडिया शाखा वनसडी येथे स्टार युनिअन डायल ईची कंपनीचा विमा काढण्याचे काम करीत होता. या युवकांनी गावातील काही नागरिकांना गळाशी धरून बँक ऑफ इंडियाने नवीन योजना आणली असून या योजनेत मुदत ठेव केल्यास जास्त प्रमाणात महिन्याला नगद स्वरूपात व्याज मिळणार व केव्हाही रक्कम उचल करता येणार असे सांगून काहींची खात्री बसविण्यासाठी त्यांना दोन तीन महिने दर महिन्याला वाढीव व्याजाची रक्कम नगदी दिली. महिन्याला जास्त व्याज मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडत इतर नागरिकांनी दुसऱ्या बँकेत असलेल्या रक्कमा उचल करून काहींनी स्वतःच्या नावे तर काहींनी पत्नीच्या, आपल्या परिवारातील सदस्यांच्या नावाने मुदत ठेव करण्यासाठी रक्कम उगले या युवकाकडे दिल्या. त्याने मुदत ठेव करणाऱ्याच्या नावाने नविन खाते काढून त्या खात्यावर मुदत ठेव केल्याच्या बँक ऑफ इंडिया शाखा वनसडी या बँकेचा शिक्का मारलेल्या पावत्या आणून नागरिकांना दिल्या. सांगितल्याप्रमाणे नागरिकांना दोन तीन महिने व्याज स्वतः आणून देत होता.

त्यानंतर उगले आपल्या भावासोबत दारू पिऊ लागला, एक दिवस आत्महत्या करतो म्हणून घर सोडून निघून गेला तेव्हा काही नागरिकांना संशय आल्याने बँकेत चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या पावत्या खोट्या असून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Recommended read: आनंद नागरी बँक : घर एकाचं, कर्ज दिलं दुसऱ्यांला

नागरिकांनी नितेश यांना रक्कम परत मागितली असता माझ्याकडे पैसे नाही आहे, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या अशाप्रकारचे उत्तर देत असल्याने पोटची भाकर समजल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात मिळालेली रक्कम बँकेत ठेवीच्या नावावर गावातील युवकाने फसविल्याचे माहीत होताच अनेकांना जोरदार धक्का बसला आहे. या प्रकरणात साखरी या गावातील जवळपास दहा ते बारा नागरिकांची फसवणूक झाली आहे. काहींनी पाच लाख, दहा लाख तर काहींना वीस लखापर्यंत फसवणूक झाली आहे.

दोन नागरिकांच्या तक्रारी आल्या आहे. आणखी काही तक्रारी येण्याची शक्यता आहे.या सर्व तक्रारींची चौकशी करण्यात येईल झालेल्या चौकशीचा अहवाल बनवून समोरील कारवाई करिता वरिष्ठांकडे पाठविणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!