चंद्रपूर: एफ.ई. एस गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रृती देवानंद मारबते ही सत्र 2022 च्या परिक्षेत नागपुर बोर्डातून संगीत विषयात १०० पैकी ९९ गुण घेत नागपूर विभागातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.

Recommaded read- पडोली-घुग्घुस मार्गावर भीषण अपघात गर्भवती महिलेसह दोन वर्षीय बालकांचा मृत्यू

श्रृती मारबतेच्या या दैदीप्यमान यशामुळे तीने महाविद्यालयाची मान उंचावली आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. माेगरे, सचिव ॲड. सातपुते, शाळा समितीचे अध्यक्ष गावंडे, शेंडे, पोटदुखे यांनी अभिनंदन केले आहे. श्रृती मारबतेने आपल्या यशाचे श्रेय आई वडील व प्राचार्य बुटले, उपप्राचार्य बेले तसेच संगीत विषय शिक्षका कुरेशी यांना दिले आहे.

One thought on “चंद्रपूरची विद्यार्थिनी संगीत विषयात नागपूर विभागातून प्रथम, एफ.ई.एस.गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!